Take a fresh look at your lifestyle.

ज्यांचे धोतर फेडण्याचे ठरविले त्यांनाच दिला खंबीर पाठिंबा; बघा, अजितदादांनी कसा केलाय ‘गेम’

अहमदनगर :

Advertisement

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर सध्या राज्यातील नेते लक्ष ठेऊन आहेत. नाही नाही म्हणता आमदार आणि खासदार विखे पितापुत्रांनी चांगला खेळ रंगवला आहे. एकाकी असणार्‍या विखेंनी आतापर्यंत 3 भाजप उमेदवार संचालकपदी निवडून आणले आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपच्या ज्या नेत्याचे धोतर फेडण्याची भाषा केली होती, त्यांच्यासाठीच फिल्डिंग लावली आहे.

Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना पवार कुटुंबाने झटका दिला आणि देत आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादी सोडून भाजपची वाट धरलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर पवार कुटुंबाचा राग आहे, हे वेळोवेळी नगर जिल्ह्याने पहिले. पिचड यांच्यासोबत त्यांचे कट्टर समर्थक सीताराम गायकर यांनीही भाजपची साथ धरली होती. त्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांना जिल्हा बँकेत सर्वात मोठी संधी उपलब्ध करून दिली होती.

Advertisement

यानंतर एका कार्यक्रमात अजितदादांनी रागाच्या भरात गायकर यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर ‘‘त्यांचे काय करायचे ते मी करतो. त्यांचे नाही धोतर फेडले तर मग पाहा.’ असे उत्तर दिले होते. मात्र आता पुन्हा याच जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांनी मोठा गेम करत गायकर यांच्याविरुद्ध असणार्‍या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले.  गायकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत व सुरेश गडाख यांनी आपण अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम मानत आपण ही भूमिका घेतली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.   

Advertisement

आता गायकर यांना आपलेसे करून अजितदादा पिचड यांची अडचण करू शकतात. पिचड विरोधकांना ताकद देऊन पिचड यांची कोंडी करण्यात आता राष्ट्रवादी यशस्वी होताना दिसत आहे. तर चक्क पिचड समर्थकांना आपलेसे करून घेण्यातही अजितदादांनी पुढाकार घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. अर्ज माघारीनंतर नेमके राजकारण स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply