अहमदनगर :
देशात सध्या इंधन दराचा आगडोंब उसळला आहे. साधारणपणे लॉकडाउनपासून इंधन दर वाढण्यास सुरूवात झाली होती. अजूनही इंधन दरात वाढ होतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या किंमती आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. देशातील पेट्रोल प्रतिलिटर 98 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबईसह बर्याच मेट्रो शहरांमध्ये इंधनांच्या किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढतच जात आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आज पेट्रोलच्या दरात २४ ते २५ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचे दर ३० ते ३१ पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये तर पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
दिल्ली :-
पेट्रोल 87.85 रुपये, डिझेल 78.03 रुपये
मुंबई :-
पेट्रोल 94.36 रुपये, डिझेल 84.94 रुपये
कोलकाता :-
पेट्रोल 89.16 रुपये, डिझेल 81.61 रुपये
चेन्नई :-
पेट्रोल 90.18 रुपये, डिझेल 83.18 रुपये
लखनौ :-
पेट्रोल 86.77 रुपये, डिझेल 78.39 रुपये
चंदीगड :-
पेट्रोल 84.55 रुपये, डिझेल 77.74 रुपये
बंगळुरू :-
पेट्रोल 90.78 रुपये डिझेल 82.72
नोएडा :-
पेट्रोल86.83 रुपये, डिझेल 78.45 रुपये
पटना :-
पेट्रोल 90.27 रुपये. डिझेल 83.22 रुपये
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव