अहमदनगर :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निकालाच्या उत्सुकतेपेक्षा अखेरीस रिंगणात कोण राहणार याचीच चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असल्याने भाजप व महाविकास आघाडीकडून कोणत्या जागेवर कोण असणार याचे कोडे उलगडणार आहे.
निवडणुकीत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटामध्ये शह-काटशाहाचा खेळ जोमात आहे. थोरात गटाला राष्ट्रवादी व शिवसेना यांची भक्कम साथ आहे. तर, माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी साथ सोडल्याने विखे मात्र एकाकी झुंज देत आहेत.
विखेंनी आतपर्यंत तरी 4 संचालक बिनविरोध निवडून आणत थोरतांना मागे टाकले आहे. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी थोरात कोणता चमत्कार करून आपल्या जागा वाढवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!