Take a fresh look at your lifestyle.

सोसायटीच्या मतदार यादीत अक्रियाशील जोमात; पहा कुठे घडलाय ‘हा’ प्रकार

अहमदनगर :

Advertisement

गावाच्या सहकारी सोसायटीची निवडणूक म्हणजे गावाच्या बड्या धेंडांना मोकळे कुरण. जमीन नसलेले आणि अक्रियाशील असे सभासद जोडून घेऊन ही निवडणूक जिंकण्याची परंपरा आहे. आताही याच मुद्द्यावर तालुक्यातील सारोळा कासार सेवा संस्थेच्या मतदार यादीवरून तालुक्याचे राजकारण तापले आहे.

Advertisement

८५५ कर्जदार सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर वर हरकती घेण्याची मुदत सध्या आहे. यादीत अनेक कर्जदार क्रियाशील सभासदांची नावे आली नाहीत, त्यांना न्याय देण्याऐवजी नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून ५२ अक्रियाशील सभासदांना मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांनी केला आहे.

Advertisement

५२ सभासदांच्या नावे जमीन नाही, त्यांना कोणतेही कर्ज देण्यात आलेले नाही असे असताना नाममात्र फी घेत त्यांना सभासद करून घेतले असल्याकडे कडू यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंदसह इतरही गावात अशाच पद्धतीने मतदार यादीचा घोळात-घोळ असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply