Take a fresh look at your lifestyle.

कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : पहा काय नियम बदलला आहे फास्टॅगचा..!

मुंबई :

Advertisement

सध्या सर्व चारचाकी आणि त्यापेक्षाही जास्त चाकी वाहनांना फास्टॅग हा कोड कंपल्सरी केलेला आहे. मंत्री इतीन गडकरी यांनी हा मुद्दा रेटून अवघ्या देशभरात फास्टॅगमय टोलनाके तयार करण्याचा विडा उचलला आहे. मात्र, त्यात आणखी एक बदल करण्यात आलेला आहे.

Advertisement

जे चारचाकी वाहन चालवितात आणि फास्टॅग वापरतात अशा ग्राहकांसाठी ही एक दिलासा देणारीच बातमी आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे की, यापुढे फास्टॅगमध्ये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही. मात्र, ही सोय फ़क़्त कार, जीप किंवा व्हॅनसाठी असले, व्यावसायिक वाहनांसाठी असणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

एनएचएआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता फास्टॅग जारी करणार्‍या बँकांना सुरक्षा ठेवशिवाय अन्य किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक करता येणार नाही. यापूर्वी विविध बँका फास्टॅगमधील सुरक्षा ठेव व्यतिरिक्त किमान शिल्लक ठेवण्यास सांगत होते. काही बँका किमान 150 रुपये तर काही बँकांची 200 रुपयांची बॅलन्स ठेवण्यास सांगत होती. कमीतकमी शिल्लक नियम असल्याने अनेक फास्टॅग वापरकर्त्यांना त्यांच्या फास्टॅग खात्यात भरीव शिल्लक असूनही टोल प्लाझामधून जाण्याची परवानगी नव्हती.

Advertisement

एनएफएआयने आता निर्णय घेतला आहे की, फास्टॅग वॉलेटमध्ये वजावट शिल्लक नसल्यास आता ग्राहकांना टोल प्लाझामधून जाण्याची परवानगी देण्यात येईल. फास्टॅग खात्यात पैसे कमी असले तरीही कारला टोल प्लाझा ओलांडू दिला जाईल. त्यामुळे कारवाल्यां दिलासा मिळणार आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply