Take a fresh look at your lifestyle.

सर्वेक्षण : मोदींच्या भाजपची चालती; मात्र, ३९ टक्क्यांना वाटते भारत वाट चुकलाय..!

दिल्ली :

Advertisement

आता अवघ्या देशाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मंदिर आणि इतर भावनिक मुद्द्यांच्या मदतीने भाजपने त्यासाठी आघाडी घेत काँग्रेसला आणखी पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी भारतीय निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अमेरिकन भारतीयांचे एक सर्वेक्षण प्रसिद्ध झालेले आहे.

Advertisement

त्यानुसार अजूनही अमेरिकन भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर विश्वास वाटत आहे. मात्र, तरीही ३९ टक्के लोकांना वाटते की, भारत वाट चुकला आहे. भारत म्हणजे यामध्ये केंद्र सरकार असे म्हटलेले आहे. एकूणच तरीही ३५ टक्क्यांनी मोदींची सत्ता उत्तम असल्याचे सांगतानाच विरोधी पक्ष काँग्रेसवर फ़क़्त १२ टक्के भारतीयांना विश्वास वाटत आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी हे अजूनही अमेरिकन भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत यावरच यामुळे शिक्कामोर्तब झालेले आहे. कार्नेगी सेंटर फॉर एंडोमेंट ऑफ पीस यांनी अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात मोदींचा आणि भाजपावरील अमेरिकन भारतीयांचा विश्वास अजूनही अबाधित आहे. मात्र, भारतातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबद्दल त्यांचे मत विभागले गेले आहे.

Advertisement

१ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२० या कालावधीत करण्यात आलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात १२०० लोकांनी भाग घेतला होता. सर्वेक्षणात लोकांना भारत योग्य मार्गावर आहे का, असे विचारले असता ३६ टक्के लोक सहमत आहेत, तर ३९ टक्के लोकांनी नाही असे म्हटले आहेत. तर, २५ टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नाही.

Advertisement

सर्वेक्षण झालेल्या ३२ टक्के लोकांनी भाजपाला पाठिंबा दर्शविला तर केवळ १२ टक्के लोकांनी कॉंग्रेसला पाठिंबा दर्शविला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ४० टक्के लोकांनी भारतातील कोणताही राजकीय पक्षच माहिती नाही, असे म्हटलेले आहे.

Advertisement

हे सर्वेक्षण जॉन हॉपकिन्स, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि यॉर्गोव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १८ टक्के भारतीयांनी भारतातील सरकारी भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. सर्वेक्षणात दहापैकी सात हिंदूंनी मोदींना पाठिंबा दर्शविला तर पाचपैकी एका मुस्लिमांनी पाठिंबा दर्शविला. तथापि, भारतीय ख्रिश्चनांचे मत एकांगी दिसले नाही.

Advertisement

विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्या लोकांचे अमेरिकेशी संबंधित विषयांवर उदारमत आहे, तर भारताशी संबंधित मुद्द्यांवरील त्यांचे मत अधिक पुराणमतवादी आहेत. १५ टक्के लोकांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेची चिंता व्यक्त केली, १० टक्के लोकांनी वाढती धार्मिकता हे चिंतेचे कारण असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply