Take a fresh look at your lifestyle.

शहांच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकांत पाटलांची सारवासारव; वाचा काय स्पष्टीकरण दिले पाटलांनी ते

मुंबई :

Advertisement

कोकणात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला. यावेळी शिवसेनेनेही या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले. मात्र आता शहा यांच्या विधानावरून भाजप तोंडघशी पडणार हे दिसत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्र्कांत पाटील यांनी पुढे येत शहा यांच्या विधांनाची सारवासारव केली.

Advertisement

पाटील यांनी आधी स्पष्ट केले की, भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेली नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की,  अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱयावर असताना शिवसेना संपण्याची भाषा केली नाही, पण मागच्या 15 महिन्यात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असे शहा म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले.

Advertisement

भाजप हा पक्ष कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असे शहांच्या बोलण्याचा अर्थ असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply