Take a fresh look at your lifestyle.

कॉंट्रॅक्ट फार्मिंग कंपनीने दिला 200 शेतकऱ्यांना झटका; केली लाखो रुपयांची फसवणूक

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या क्रांतिकारी म्हणवल्या जाणाऱ्या कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे. त्याचवेळी मध्यप्रदेश राज्यासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करून पळून गेलेल्या कॉंट्रॅक्ट फार्मिंग कंपनीची उदाहरणे उघडकीस येत आहेत.

Advertisement

बैतुल या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शेतकऱ्यांना शेवगा लागवड करण्यासाठी तयार करून एकरी तब्बल 20 हजार रुपये कंपनीने घेतले होते. मात्र, आता पैसे घेऊन झाल्यावर कंपनीचे कार्यालय बंद असून सर्व फोन बंद येत आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश राज्यात हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

Advertisement

शेवग्याच्या रोपांसह एकूण खर्च देतानाच उत्पादित शेंगा खरेदी करण्याचा करार कंपनीने केला होता. सुमारे 200 शेतकऱ्यांच्या सोबत असा करार करण्यात आला मात्र, पैसे घेऊन झाल्यावर ही कंपनी आता फरार झाली आहे. मागील सहा महिन्यापासून हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे हेलपाटे घालीत आहेत. मात्र, अजूनही काहीच कारवाई झालेली नाही.

Advertisement

आज तक या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, आता याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस एकमेकांना दोषी ठरवत आहेत. मंत्री कमल पटेल यांनी याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे म्हटले आहे. मात्र, देशभरात कायदा लागू झाल्यावर अशा घटना आता समोर येत असतानाच यावर नेमकी कोणती ठोस उपाययोजना नव्या कायद्यात आहे, हेही शेतकऱ्यांना माहित नाही.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply