Take a fresh look at your lifestyle.

महावितरणचा मोठा निर्णय; महाराष्ट्राच्या ‘त्या’ भागातील 14 लाख कनेक्शन तोडणार!

पुणे :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचणीत असलेल्या महावितरणने पश्चिम महाराष्ट्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. जर ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा थांबवला जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

आर्थिक कोंडीतून बाहेर पाडण्यासाठी महावितरणने हा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.  पुणे प्रादेशिक संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल (electricity bill) न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्यात येईल.

Advertisement

महावितरणने केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, . महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. परंतु, त्याआधीच थकबाकीचा भरणा करून ग्राहकांनी सहकार्य करावे   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply