Take a fresh look at your lifestyle.

कच्चा तेलाची भाववाढ; पेट्रोल-डिझेलचाही होणार भडका, Rs. 100 वर जाण्याची शक्यता

मुंबई :

Advertisement

जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यावर बहुतांश देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कच्चा तेलाची भाववाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता भारतात पेट्रोल आणि डीझेल यांचे भाव लवकरच 100 रुपये लिटरवर जाण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

आता वर्षभरानंतर पहिल्यांदाच प्रति तेल पिंपाचा दर ६० डॉलरच्या पुढे गेला आहे. ऑक्टोंबर महिन्यापासून जागतिक बाजारात आतापर्यंत कच्चा तेलाच्या दरांमध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. कच्चा तेलाचे भाव बळकट करण्यासाठी सौदी अरेबियाने तेल उत्पादनात प्रतिदिन १० लाख बॅरलची घट केली आहे. त्याचे परिणाम म्हणून आता भाववाढ सुरू झालेली आहे.

Advertisement

कूण तेलाची जितकी आवश्यकता आहे, त्याच्या ८० टक्के तेल आयात भारतात करावी लागते. महसूल वाढवण्यासाठी सरकारने पट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे १३ आणि ११ रुपयांची केंद्रीय करवाढ केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांचे दर कमी असूनही ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकला नाही. त्यात आता भाव वाढणार असल्याने मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ९३.८३ तर प्रतिलिटर डिझेलचा दर ८४.३६ असतानाच अनेकांना आता याचे भाव थेट शंभरावर जाण्याची भीती आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply