Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. AI ची शेतकऱ्यांवरही बाजी; १९७ % उत्पादनवाढ आणि ९० टक्के पाणीबचत..!

भविष्यातील शेती म्हणजे तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर होणारी शेती असणार आहे. त्याचीच झलक चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत पाहायला मिळाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे (एआय/कृत्रिम बुद्धिमत्ता) अद्ययावत तंत्रज्ञान, मशीनचा वापर केलेल्या गटाने शेतकरी गटावर सहजगत्या मात केली आहे.

Advertisement

युनायटेड नेशन्स यांनी ही अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. चार महिने ही स्ट्राॅबेरी शेतीची अनोखी स्पर्धा चालली. कृषी क्षेत्रात चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या अनुषंगाने काय बदल होणार याचीच झलक यातून दिसली आहे.

Advertisement

 पहिल्या टीममध्ये पारंपरिक शेती करणारे शेतकरी तर दुसऱ्या टीममध्ये शेतकऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला होता. त्यात पारंपरिक शेतीच्या तुलनेत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे १९७% अधिक उत्पादन घेतले. टेक्नॉलॉजी टीमच्या शेतकऱ्यांनी गुंततवणुकीच्या तुलनेत ७५.५% जास्त परतावा मिळवला.

Advertisement

युक्त राष्ट्राच्या खाद्य व कृषी संघटनेने स्मार्ट औद्योगिक शेती स्पर्धेचे आयोजन चीनच्या कृषी तंत्रज्ञान मंच ‘पिंडोदुओ’ आणि चीन कृषी विद्यापीठात केले होते. तापमान आणि आर्द्रतेला नियंत्रित करण्याासाठी इंटेलिजंट सेन्सरचा वापर, पाणी आणि मातीतील पोषक तत्वांना अबाधित ठेवण्यासाठी पॉलीमर तंत्रज्ञान ही या स्पर्धेची ओळख ठरली.

Advertisement

यात वापरलेले पॉलीमर स्वत: विषाणू आणि जिवाणूंना राेखण्यात सक्षम असल्याने किटकनाशकांची तर गरजही भासली नाही. तसेच  पारंपरिक शेतीच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यांपर्यंत कमी पाणी लागले. पिकांची निगराणी आणि मशागतीची अचूकता वाढवण्यासाठी अॅग्रोटेक्नॉलॉजीची क्षमता आगामी काळात महत्त्वाची ठरू शकते हेच यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply