Take a fresh look at your lifestyle.

मोदींनी केला गुरूंवर प्रहार; पहा शरद पवारांवर नेमकी काय केलीय टीका ते

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. मोदींनी पवारांना राजकीय गुरू अशी उपाधी दिलेली आहे. आज त्याच गुरूंवर मोदींनी कडाडून टीका केली आहे. त्याला निमित्त ठरले आहे कृषी सुधारणा विधेयकाच्या राजकारणाचे.

Advertisement

संसदेत बोलताना मोदी म्हणाले की, “एपीएमसी कायदा बदलला आहे असं कोण गर्वाने सांगत होतं, २४ असे बाजार उपलब्ध झाल्याचं कोण सांगत होतं…तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार बोलत होते. शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता का निवडला आहे अशी शंका येते.”

Advertisement

शरद पवारांनी २००५ मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबधी केलेलं वक्तव्य वाचून दाखवत मोदींनी त्यांच्या स्टाईलने पवारांना लक्ष्य केले आहे. आता त्यावर मोदींचे गुरू असलेले शरद पवार कोणते प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply