Take a fresh look at your lifestyle.

फ़क़्त तीनच महिन्यात १५७३ कोटी ‘अदाणीं’च्या खिशात; पहा कुठून कमावले इतके पैसे

मुंबई :

Advertisement

अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड) कंपनीने मंगळवारी आपले नफ्याचे आकडे जाहीर केले आहेत. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत अदानी ग्रुपने तब्बल १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा खिशात घातला आहे.

Advertisement

एपीएसईझेडचे कार्याकारी अध्यक्ष असणाऱ्या करन अदानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एपीएसईझेड सध्या लॉजिस्टी आणि गोदामाच्या उद्योगांमधील गुंतवणूक वाढत आहे. यामध्ये ट्रॅक्स, ट्रॉली तसेच मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्क, गोदामे उभारण्यासाठी जमीनी विकत घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तसेच ग्रीन हाऊन गॅस एमिशन आणि कमीत कमी गोष्टी वाया जातील याकडे लक्ष देऊन २०२५ पर्यंत कार्बन न्यूटल पद्धतीने उद्योग करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

Advertisement

एपीएसईझेड ही भारतामधील सर्वात मोठी बंदर निर्मिती आणि वाहतूक कंपनी आहे. देशात १२ महत्वाच्या ठिकाणी एपीएसईझेडची केंद्र असून  मुंद्रा, दाहीज, कांडला, हजीरा या गुजरातमधील चार, ओदिशामधील धामरा, गोव्यातील मोरमूगाव, आंध्रमधील विशाखापट्टणम आणि कृष्णापट्टणम तसेच चेन्नईमधील कत्तुपाली, एन्नोरे येथे एपीएसईझेडचे ऑपरेशन चालू आहेत.

Advertisement

भारताच्या एकूण बंदरावरील व्यापारात कंपनीचा वाटा तब्बल २४ टक्के इतका मोठा आहे. केरळमधील तसेच म्यानमारमध्ये कंटेनर टर्मिनल उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. कंपनीची एकूण कमाई ही तिसऱ्या तिमाहीमध्ये चार हजार २७४ कोटी ७९ लाख रुपये इतकी आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा तीन हजार ८३० कोटी ४३ लाख इतका होता. कंपनीने दिलेल्या खर्चाच्या हिशोबानुसार कंपनीने यंदाच्या तिहामीमध्ये दोन हजार २५८ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये हा आकडा दोन हजार ९१ कोटी ४० लाख रुपये इतका होता.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply