Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून पुन्हा वळले शेतीकडेच पाय; वाचा फुलउत्पादकाची स्टोरी

मी दिलीप बाबाजीराव देशमुख. ता. अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेती व्यवसाय वडीलोपार्जित होता परंतु वडीलांच्या अकाली निधनानंतर थोरले बंधु गणपत देशमुख यांच्याकडून शेतीचे धडे गिरवत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर थोडे दिवस नोकरीही केली परंतु नोकरीत मन रमेना मग शेवटी शेतीकडे पाय पुन्हा वळाले.

Advertisement

सुरवातीला फक्त भात शेती व उपजीविकेपुरते भाजीपाला उत्पादन होत असे त्यानंतर फळबाग लागवड केली. कृषि विभागाच्या मदतीने  व मार्गदर्शनाखाली फुलशेती मध्ये मोगरा, कागडा, अबोली, चमेली या पिकांची लागवड करुन, बहुविध पीक पध्दतीने उत्पादन घेणे सुरु केले. गवती चहा, अळू इत्यादी पिकांचीही लागवड करुन त्यापासून उत्पादन घेतलं या जोडीला कृषि पर्यटन केंद्र सुरु करण्याचे ठरविले.

Advertisement

कृषिरत्न श्री. शेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ मध्ये कृषि पर्यटनाचे प्रशिक्षण पूर्ण करुन कृषि पर्यटन व्यवसाय सुरु केला. या शेतातील कृषि पर्यटन केंद्र हे प्रामुख्याने महाविद्यालयातील विद्यार्थी, अभ्यास वर्ग, विविध वनस्पतीची माहिती घेणारे यांच्यासाठीच खुले असते. शहरी भागातील पर्यटकांना, तरुणांना शेती विषयक माहिती देणं हा कृषि पर्यटनाचा प्रमुख उद्देश आहे. शेती संस्कृती व निर्सगाशी शहरातील लोकांची नाळ जोडण्याचे काम या माध्यमातून होत आहे. कृषि पर्यटनाच्या माध्यमातून सध्या वार्षिक ५ ते ६ लाख रुपयांचे खात्रीशीर उत्पन्न मिळतं. तर शेती उत्पादनातून ३ ते ४ लाखाचे उत्पन्न मिळते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येण्यास मदत झाली आहे. परिसरातील १५ ते २० शेतकऱ्यांनीही कृषि पर्यटन केंद्राची सुरवात केली आहे. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. खरोखरचं कृषि पर्यटनाने सन्मान मिळवून दिला आहे.

Advertisement

या कामाची दखल घेवून शासनाने २००८ मध्ये शेतीनिष्ठ व २०१६ मध्ये वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्काराने मला सन्मानित केलं. सन्मान प्राप्त झाल्यानंतर कामधेनू शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरु केली.

Advertisement

तसेचं कृषि भूषण शेतकरी गटाच्या माध्यमातून गट शेती योजनेअंतर्गत २० शेतकऱ्यांना एकत्र करुन सिंचनाच्या सुविधेसाठी पाईप लाईन, सामूहिक शेततळे, ठिबक सिंचन, सेंद्रीय घटकसाठी ३ गांडुळ कल्चर युनिट, १ सामूहिक गोठा याबाबी पूर्ण करुन परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करुन सामूहिकरित्या फायदा करुन दिला. गट शेती प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सुमारे ३० हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले असून फळबागाचे क्षेत्र २० हे ने वाढले आहे तर इतर हंगामी पिकाचे क्षेत्र १० हेक्टरने वाढले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून एकत्र  येवून शेती केल्याशिवाय भविष्यात पर्याय नाही. त्याला सेंद्रिय शेतीची जोड आवश्यक आहे. शेतीला कृषि पर्यटनाची  जोड दिली तर आर्थिक स्थैर्य, स्थिरता व सन्मान या गोष्टी शेतकऱ्याला मिळतील. आज मला जे आर्थिक स्थैर्य मिळालं ते केवळ शासनाच्या कृषी विभागमुळं…. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी उत्तम प्रकारची शेती करीत आहे.

Advertisement

Source : mahasamvad.in

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply