Take a fresh look at your lifestyle.

आता दीर्घकाळ साठवता आणि टिकवता येणार कांदा; वाचा, पुण्याच्या कंपनीने विकसित केलेल्या ‘या’ भन्नाट तंत्रज्ञानाविषयी

दिल्ली :

Advertisement

शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रयोग पुण्यातील खेड तालुक्यातील एका कंपनीने केला आणि यशस्वीही करून दाखवला. कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा आयात-निर्यात व्यावसायिक यांच्यासाठी हा प्रयोग पर्वणी ठरणार आहे. कारण कांदा साठवणूक ही कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा आयात-निर्यात व्यावसायिकांची सर्वात मोठी अडचण होती. ती आता या तंत्रज्ञानाने दूर होणार आहे.

Advertisement

तब्बल 3 वर्ष या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असून या तंत्रज्ञानासाठी खर्चही कमी येतो. राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय आणि कला बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी दीर्घकाळ कांदा साठवणुकीसाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या आधुनिक संकल्पनेवर आधारित ‘कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे नवीन तंत्रज्ञान ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ तत्त्वावर संयुक्तपणे विकसित केले आहे.

Advertisement

नैसर्गिक कांदा चाळीमध्ये होणारे नुकसान हे मोठ्या प्रमाणात असते. आधारित ‘कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर’ या नव्या तंत्रज्ञानामुळे नुकसानीला मोठ्या प्रमाणात आला बसणार आहे.  

Advertisement

नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान, वाचा मुद्देसूद :-

Advertisement
  1. चाकण येथील कला बायोटेक प्रा.ली या कंपनीच्या मदतीने दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर तयार करण्यात आले.
  2. या स्टोरेजमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक केली. त्यामुळे पुढील काळात कांद्याच्या साठवणीसाठी तयार झालेले कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
  3. साठवण गृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित करून हवा खेळती राहण्यासाठी तयार केले आहे.
  4. प्रतिकिलो प्रतिमहिना 60 पैसे खर्च येतो.
  5. साठवलेल्या कांद्याच्या स्थितीची मोबाईलद्वारे माहिती घेता येते आणि नियंत्रणही ठेवता येते.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply