Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीची स्वबळावची भाषा; महाविकास आघाडीच्या मित्रापाक्षांचीही होणार गोची..!

उस्मानाबाद :

Advertisement

येथील लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवावी, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, गोविंदराव साळुंके, माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवक तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, नगरपंचायतची यापूर्वीची झालेली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवली होती. त्याचप्रमाणे यावेळीही निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबतचा विचार कार्यकर्त्यांचा आहे.

Advertisement

ढील काही दिवसांत लोहारा नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे आढावा घेण्यासाठी व पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोहारा येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply