Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘तिथे’ मिळणार चिमुरड्यांसह पक्षांसाठी चारापाणी; १८९२ ठिकाणी होणार सेन्टर्स

उस्मानाबाद :

Advertisement

पक्षी आणि चिमुरडे यांचे भावनिक नाते अतूट असते. लहान मुलांना चिऊ-काऊच्या गोष्टी जशा आवडतात, तसेच पक्षांना लहान मुलांच्या भोवती जाऊन खायला आवडते. हेच नैसर्गिक नाते आणखी घट्ट करण्यासाठी आता जिल्हा परिषद सरसावली आहे.

Advertisement

जिल्ह्यातील १८९२ अंगणवाडी परिसरात महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पक्ष्यांसाठी चारा-पाणी उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी काही अंगणवाडी केंद्रांना भेट देवून नुकतीच पाहणी केली.

Advertisement

नागरिकांनीही त्यांच्या परिसरात पाळीव प्राण्यांबरोबर पक्षी व जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, ही धरती केवळ माणसासाठी नाही तर अन्य जीवांसाठी ही आहे. याची आठवण प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे यावेळी फड यांनी म्हटले आहे.

Advertisement

बालविकास प्रकल्प अधिकारी जे. जी. राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी ए. बी. कांबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका के. पी. मोहिते, ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्वाचा पर्यावरणप्रेमी उपक्रम या जिल्ह्यात राबवला जात आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply