Take a fresh look at your lifestyle.

कृषी मार्गदर्शिका : ऊसाची लागवड करताना ‘या’ बाबी घ्या लक्षात; योग्य व्यवस्थापन देईल भरघोस उत्पादन

बर्‍याचदा असे होत असते की, पिकासाठी हवामान अनुकूल किंवा पोषक नसते. अशावेळी त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान ऊस शेतकर्‍यांसमोर असते. अशावेळी कामी येते ते व्यवस्थापन. कुठल्याही पिकाबाबत योग्य व्यवस्थापन केल्यास भरघोस आणि दर्जेदार उत्पन्नाची हमी नक्कीच मिळते.

Advertisement

महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी ऊसाची लागवड करतात. त्यामुळे आज आपण ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ऊसाची लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Advertisement

जमिनीची खोली जास्त असल्यास पिकाला काय धोका असतो? अतिपर्जन्यमान असलेल्या परिसरात काय काळजी घ्यावी, रोगाचा प्रादुर्भाव कसा कमी करावा, यासारख्या अनेक मुद्द्यांवर आज आपण भाष्य करणार आहोत.   

Advertisement
  1. ज्या जमिनीत आपल्याला ऊसाची लागवड करायची आहे, ती जमिन खोल असल्यास अतिपावसाच्या कलावधीत पिक लोळण्याची शक्यता असते. अशावेळी सोपं पर्याय म्हणजे ४ ते ५ ऊस बेटे पात्याने एकत्र बांधून घेणे.
  2. ऊस लागवड करताना त्याला खत किती द्यावे हे तुमच्या भागावर ठरते. तुम्ही जे अवर्षणप्रवण भागातील असाल तर साहजिकच उन्हाळ्यात पाण्याची कमी जाणवते. अशावेळी खताची मात्रा पाण्यानुसार बांधणीच्या वेळी 50 टक्क्यांपर्यंत कमी करावी. पावसाळ्याचा काळ सुरू झाल्यास उर्वरित रासायनिक खतमात्रा पहारीच्या साह्याने द्यावी.
  3. पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास मोठ्या उसामध्ये सलग सरी पद्धतीत ४ ते ५ सरीनंतर ऊस दाबून घेऊन भांगा पाडाव्यात.
  4. नदीलगतच्या क्षेत्रात पूर येऊन ऊस पीक बुडते. अशा ठिकाणी पूर ओसरल्यावर पाण्याचा निचरा त्वरित करून घ्यावा.
  5. सरीत कायम वाळलेली किंवा बिनाकामची पाने टाकून देत चला. त्यामुळे तणावर नियंत्रण राहते.  

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply