Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पंकजाताईंनी थेट ‘रुळा’वर येऊन फोटो केला शेअर; वाचा महत्वाची घडामोड

औरंगाबाद :

Advertisement

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मागील काही कालावधीत पक्षापासून काहीशा अलग असल्याचे वाटत होते. मात्र, त्यांना केंद्रातील पदाधिकारी म्हणून जबाबदारी भेटल्यावर आता त्यांची राजकीय गाडी पुन्हा रुळावर आली आहे. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर येऊन त्यांनी एक फोटो शेअर करून याचीच झलक दाखवली आहे.

Advertisement

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात ५२७ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांची तरतूद केली. यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे, यासंदर्भात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.

Advertisement

Pankaja Gopinath Munde on Twitter: “बीड-नगर-परली रेल मार्ग का अत्यंत कठीण सपना साकार होता नजर आ रहा है।बीड के विकास में सदैव कोशिश की आहूती हम दे रहे है।गोपीनाथ मुंडे जी ने हमे जनसेवा का जो व्रत दिया है, वह हम कभी भी नही भूलेंगे। इस रेल मार्ग को 527Cr रूपये प्रदान करने के लिए @narendramodi, @PiyushGoyal को धन्यवाद! https://t.co/pyKIgaoQaV” / Twitter

Advertisement

तर, आता पंकजाताईंनी थेट रूळावरील फोटो शेअर करून म्हटले आहे की, वडील गोपीनाथ मुंडे यांनी या रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. त्याला भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे आता हे सत्यात उतरणार आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोयल यांचे आभार.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात देशातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात ५२७ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपये मंजूर केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply