Take a fresh look at your lifestyle.

योजना डायरी : या स्कीमद्वारे मिळते पेन्शन; वाचा अटल स्कीमबद्दल माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरात अटल पेन्शन स्कीम लागू केली आहे. अटल पेन्शन योजना ही निवृत्तीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे.

Advertisement

पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये अशी :

Advertisement

ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे.

Advertisement

ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही त्यांना ही खूपच लाभदायक आहे.

Advertisement

बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होत आहे.

Advertisement

18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.

Advertisement

18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल.

Advertisement

याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल.

Advertisement

दर महिन्याचे योगदान बँक बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.

Advertisement

यासाठी सरकारचे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे.

Advertisement

ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे.

Advertisement

ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील.

Advertisement

दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.

Advertisement

आपले बँक खाते ज्या शाखेत आहे तिथे जाऊन आपण यासाठी अर्ज भरून पेन्शन स्कीम सुरू करून घेऊ शकता.

Advertisement

स्त्रोत : केंद्र सरकार व गुगल

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply