Take a fresh look at your lifestyle.

भारतात पेट्रोल-डिझेल महाग मग शेजारील देशात का आहे स्वस्त; वाचा, केंद्र सरकारने काय दिलेय उत्तर

दिल्ली :

Advertisement

देशात सध्या इंधन दराचा आगडोंब उसळला आहे. साधारणपणे लॉकडाउनपासून इंधन दर वाढण्यास सुरूवात झाली होती. अजूनही इंधन दरात वाढ होतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या किंमती आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. देशातील पेट्रोल प्रतिलिटर 98 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबईसह बर्‍याच मेट्रो शहरांमध्ये इंधनांच्या किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल 87 रुपयांच्या वर तर मुंबईत ते 94 रुपयांच्या पलिकडे विकले जात आहे.

Advertisement

या विषयावर स्पष्टीकरण देताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून आहेत, म्हणून इंधन विक्रमी उच्चांकावर आहे. यावेळी त्यांनी शेजारच्या देशांशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची तुलना करणे न्याय्य केले नाही.

Advertisement

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राज्यसभेत तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत प्रतिक्रिया दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारताच्या तुलनेत नेपाळ आणि श्रीलंकेत कमी का आहेत, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करेल का? यावर पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, या देशांमधील किमतिशी भारताची तुलना करणे चुकीचे आहे कारण कमी लोक त्याचा वापर करतात. बांगलादेशात रॉकेलची किंमत 57 ते 59 रुपये प्रति लिटर आहे, तर भारतात रॉकेलची किंमत 32 रुपये प्रति लिटर आहे.

Advertisement

आपल्या देशात राज्य सरकारे आणि केंद्र सरकार त्यांच्या कर संकलनाबद्दल सावधगिरी बाळगतात, कारण प्रत्येकाची स्वतःची कल्याणकारी बांधिलकी, विकास प्राधान्यक्रम आहेत. ते म्हणाले की, केंद्राने उत्पाद शुल्कात वाढ केली आहे आणि राज्यांनी व्हॅट वाढविला आहे. मात्र, केंद्र सरकारनेही किंमती कमी केल्या आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply