Take a fresh look at your lifestyle.

पवारांच्या हस्ते होणार ‘किंगबेरी ग्रेप्स’चे लोकार्पण; पहा काय आहे याची खासियत

सोलापूर :

Advertisement

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी स्व. नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होत आहे.

Advertisement

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री शामराव पाटील, विरोधी पक्षनेते बळीराम साठे, आदी उपस्थितीत राहणार आहेत.

Advertisement

कृषिभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, प्रयोगशील, संशोधन वृत्तीची परंपरा कायम ठेवत दत्तात्रय काळे यांनी यंदाच्या दशकातील पहिल्याच वर्षात नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असे नवे वाण उत्पादित केले आहे. नियमित द्राक्षापेक्षा आकाराने, वजनाने मोठा असलेला आणि शेतकऱ्यांना सधन करणार आहे.

Advertisement

वैशिष्ट्ये :

Advertisement
  1. द्राक्षाची गोडी, चव आणि रंग नैसर्गिक 
  2. द्राक्षमणी एकसारख्या आकाराचे
  3. मण्यांची लांबी ४५ ते ५० मिमी
  4. मण्यांची जाडी २४ ते २५ मिमी
  5. निर्यातीत इतर रंगीत द्राक्ष वाणापेक्षा २५ ते ३० टक्के अधिक दर 
  6. एकरी १२ ते १४ टन एकूण उत्पन्न
  7. नैसर्गिक लांबी व फुगवण जास्त असल्याने संजीवकाचा वापर कमी 

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply