Take a fresh look at your lifestyle.

‘महा कृषी ऊर्जा’ देणार शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीची संधी; वाचा योजनेची माहिती

अहमदनगर :

Advertisement

कृषिपंपाच्या नवीन वीज जोडण्या तसेच वीज बिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीची संधी आहे.

Advertisement

अभियानात सर्व कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. 

Advertisement

ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेऊन त्यावर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीज बिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.

Advertisement

वसूल झालेल्या बिलातील ६६ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार असल्याने महावितरणतर्फे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांशी थेट संवाद साधून अभियानाची माहिती दिली जात आहे. एकूणच या अभियानाद्वारे मोठ्या प्रमाणात वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या वतीने काम चालू आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply