पुणे :
सिमेंट आणि लोखंड म्हणजे बांधकामाचा कणा. मात्र, याचेच भाव गगनाला भिडल्याने बांधकाम व्यावसायिक आणि घर बंधू इच्छिणाऱ्या मंडळींना मोठा आर्थिक भर सहन करावा लागत होता. त्यालाच दिलासा देण्याचे महत्वाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे.
बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई अाणि नरेडकाेने केंद्र सरकारला पत्र लिहून विनंती केल्यानुसार बजेटमध्ये काही ठोस तरतुदी करण्यात आल्या. परिणामी स्टीलचे दर अर्थसंकल्पानंतर ६० रुपये किलोवरून ५१ रुपयांपर्यंत म्हणजे ९ रुपयांनी कमी झाले अाहेत. मात्र, यात आणखी किमान ३५ टक्के भाव कमी होण्याची गरज व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
बांधकाम उद्योगाला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने करोना कालावधीत मुद्रांक शुल्क सवलत व प्रीमियम शुल्कात ५० टक्के कपात योजना जाहीर केल्यामुळे उद्योगविश्वात सकारात्मक वातावरण आहे. त्यात हे भाव कमी झाल्याने अनेकांनी याचे स्वागत केले आहे.
सिमेंटच्या किमतीत २३ टक्क्यांपेक्षा अधिक तर लोखंडाच्या किमतीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मागील वर्षी जानेवारी, फेब्रुवारी २०२० ला सिमेंटच्या ५० किलो पिशवीची किंमत २३० रुपये होती. सध्या ती ३२०-३३० रुपयांच्या आसपास आहे.
लोखंड उत्पादकांकडून वाढत्या मागणीचा गैरफायदा उचलला जात असून प्रत्येक महिन्याला लोखंडाच्या किमतीत वाढ केली जात असल्याचाही अाराेप केला जात हाेता. २०२० या वर्षाच्या सुरुवातीला प्रतिटन लोखंडाची किंमत ३८ ते ४० हजार रुपये होती. ती अर्थसंकल्पापूर्वी थेट ६० हजार रुपये प्रतिटन झाली हाेती. त्यामुळे आता सिमेंट हे २८ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवण्याऐवजी याचे रेट कमी करण्याची मागणी होत आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज