Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचीही असते योग्य वेळ; जाणून घेण्यासाठी वाचा ही माहिती

तुम्ही केव्हापासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात, हे फार महत्त्वाचे नाही तर एक प्रश्न महत्त्वाचा आहे की, मी शेअर कधी खरेदी अथवा विक्री केला पाहिजे? विशेषत: तुम्ही मार्केटमध्ये नवे असाल तेव्हा हा प्रश्न आणखी महत्त्वाचा ठरतो. योग्य ज्ञान घेतले तरच, तुम्हाला नफा होतोय की तोटा हे ओळखता येईल. आपण शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी कोणत्या प्रमुख गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

Advertisement

खरेदी करण्याच्या उद्देशात बदल: एखाद्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करत असताना त्यामागे कारण असणे आवश्यक आहे. उदा. एका प्रमुख बँकेचे शेअर्स खरेदी करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात, कारण तिच्या सीईओंच्या अर्थविषयक कौशल्यावर तुमचा विश्वास आहे. एकदा का ते पदावरून दूर झाले की, गुंतवणुकीसाठी कारणच उरत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की, बँक अपयशी होईल किंवा तिच्या शेअर्सची किंमत घसरेल. तरीही तुमची गुंतवणूक एका विशिष्ट घटकावर अवलंबून होती, म्हणून तुम्ही ते शेअर्स विकणेच योग्य ठरेल. नेहमीच गुंतवणूक करताना कारणे पहा, कारण नष्ट झाल्यावर आपण त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणेच योग्य ठरेल.

Advertisement

उद्योगातील क्रांती: एखादी कंपनी ज्या क्षेत्रात आहे तेथे नियामांमध्ये सुधारणा किंवा पूर्ण परिवर्तन असे रचनात्मक बदल होत असतात. उदा. काही वर्षांपूर्वी डीटीएच क्षेत्र बहरात होते. लोक सेट-टॉप-बॉक्स आणि डिश कनेक्शन खरेदीसाठी धाव घेत होते. अगदी सरकारनेही या गोष्टीला प्रोत्साहन दिले. पण अचानक ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रवेश झाला आणि त्यांनी ही बाजारपेठ खिशात टाकली. हा जणूकाही एका रात्रीतून झालेला बदल असावा. डीटीएच क्षेत्र जवळपास थांबल्यासारखेच झाले. याच कारणास्तव आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, तेथील भविष्यातील तंत्रज्ञानावर लक्ष ठेवले पाहिजे. भूतकाळात हे क्षेत्र किती बहरात होते, याने फार फरक पडत नाही, आपण भविष्यवर लक्ष ठेवले पाहिजे आणि काही धोका दिसत असल्यास आपले स्थान तत्काळ बदलले पाहिजे. 

Advertisement

मर्यादित भांडवल: तुम्ही कर्मचारी असाल अथवा अब्जाधीश असाल, प्रत्येकालाच भांडवलाची मर्यादा असते. तुम्ही तुमचे सर्व भांडवल एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले आणि एखादी उत्कृष्ट संधी तुम्हाला दिसली तर तुम्ही मागील शेअर्स विकले पाहिजेत आणि आणखी चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

Advertisement

10 मिनिटांमध्ये शेअर बाजारासाठी लागणारे डीमॅट खाते उघडण्यासाठी क्लिक करा : https://www.5paisa.com/open-demat-account/?referralcode=51427937

Advertisement

मूलभूत तत्त्वे: हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. समजा, तुम्ही स्थिर कॅश फ्लो आणि कमी कर्ज असलेल्या कंपनीत शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र अलीकडेच कंपनी कर्जात बुडून वाईट प्रतिमा निर्माण करत असेल किंवा प्रमोटर्स तिच्यापासून दूर रहात असतील, शेअर्स गहाण ठेवले असतील इत्यादी. तेव्हा हे शेअर्स तत्काळ विकणे योग्य ठरते.

Advertisement

किंमत खूप वाढली असताना शेअर्स विकणेही योग्य नाही. तुम्हाला चांगला गुंतवणूकदार व्हायचंय किंवा शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करायची असेल तर तुम्ही किमान १० पटींनी परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. त्यामुळे शेअर्स विक्री करण्यापूर्वी, त्यांची किंमत चांगली असेल तेव्हा थोडा वेळ वाट पहा आणि कंपनीवर विश्वास असेल तर तिला आणखी एखादी संधी द्या.

Advertisement

शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट वेळ कोणती हे पाहुयात:

Advertisement

जास्त मागणी असलेले शेअर्स टाळा: ‘चुकीचे शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणतीच नसते’, हे शब्द नेहमीच लक्षात ठेवावेत. शेअर्स कधी खरेदी करावेत, यापेक्षा ते कधी खरेदी करू नयेत, हे जाणून घ्या. उदा. एखादा शेअर दररोज ५२ आठवड्यातील उच्चांक मोडत असल्याने माध्यमांत झळकत असेल, असंख्य लोक तो शेअर खरेदी करत असतील तरीही ही गर्दी कोसळणार आणि शेअरचे मूल्य नक्कीच कमी होईल. याचाच अर्थ या हाइपमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्ही भांडवलाचा एक भाग गमवाल. कदाचित तो स्टॉक लोअर स्टॉकवर जाईल तेव्हाही तुम्ही तो शेअर खरेदी करु शकणार नाहीत, अशीही शक्यता आहे. त्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेले व माध्यमांत झळकणारे शेअर्स टाळा. जर ते वाढले नाहीत किंवा उच्च स्तराला नाही पोहोचले किंवा स्थिर राहिले तरीही काही वेळाने का होईना, तुम्ही स्थिर होऊ शकाल.

Advertisement

भांडवल वाटप चक्र पूर्ण झाले: उदा. एखाद्या कंपनीची मागील पाच वर्षातील कामगिरी अत्यंत चांगली असेल, तिने जवळपास ५००० कोटींचा नफा जमवला असेल तर कंपनी ७५०० कोटी रुपये खर्च असलेला नवीन उत्पादन प्रकल्प उभारायचा निर्णय घेते. तरीही ती व्यवसायासाठी खुली नाही. कागदोपत्री ती कंपनीसारखी वाटत असली, प्रचंड नफ्यात असूनही आता २५०० रुपयांचे कर्ज असेल व आता त्यातून फार उत्पन्न मिळत नसेल तर तुम्ही कदाचित त्या कंपनीला नाकारू शकता. पण तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, नवीन प्रकल्पात प्रक्रिया सुरू होताच, तिची विक्री दुप्पट होईल. एकदा असे घडले की, शेअर्सच्या किंमतीही दुप्पट होतील.

Advertisement

उद्योगाची वृद्धी: आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करतो, तेथे वृद्धीची शक्यता आहे की नाही, हेही तपासून पाहिले पाहिजे. आपण काही वर्षांपूर्वीचाही अभ्यास केला पाहिजे, हे क्षेत्र वाढत राहणार किंवा स्थिर राहिल, हे तपासले पाहिजे. उदा. स्वत:ला एक प्रश्न विचारा की, पाच वर्षांनंतर लोक लॅपटॉप वापरणार आहेत का? उत्तर होय असेल तर त्या उद्योगात गुंतवणूक करा. तर, आता शेअर्स कधी खरेदी करायचे आणि कधी विकायचे, याची मूलभूत तत्त्वे तुम्हाला कळाली. यात थोडी अभ्यासपूर्वक, वेळ देऊन पार्श्वभूमी अभ्यासावी लागते, त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply