Take a fresh look at your lifestyle.

दुधाळ गायीची निवड करताना ‘या’ गोष्टी घ्या लक्षात; वाचा महत्वपूर्ण माहिती

गायीची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गाय आपण नेमकी कोणत्या कारणासाठी घेतो आहे, हे नक्की करा. दुध उत्पादनासाठी, शेती कामासाठी की दुहेरी उपयोगासाठी हे नक्की करावे.

Advertisement

सहिवाल, रेड सिंधी, गिर, हरियाणा या गायी प्रामुख्याने दुध उत्पादनासाठी तर खिल्लारी, गवळाऊ, कांगायम, डांगी या गायी शेती कामासाठी वापरल्या जातात. थारपारकर, देवणी, ओंगोल, हरियाणा या गायी दुहेरी उपयोगासाठी आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की, दुधाळ गायीची निवड कशी करावी.

Advertisement
  1. रागीट स्वभावाच्या गाई या उत्तेजित झाल्यावर पान्हा चोरतात म्हणून गाय निवडताना गायीचा स्वभाव शांत आहे, असे पाहून निवड करावी.
  2. गाई विकत घेण्यापूर्वी चारही सडातील दुध काढून पाहावं. ज्यावरून आपल्या हे लक्षात येईल की, गाय दूध काढताना कशी प्रतिक्रिया देते. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळं दूधही कमी निघते त्यामुळे धारेला (पिळण्यासाठी) हलकी असणारी गाय निवडावी.   
  3. या गोष्टी घ्याव्या तपासून – डोळे पाणीदार असावे, अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असावी, शरीराचा आकार वरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे असावा, वरून पाहिलं असता कमरेची हाडं दूरवर असावीत, बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं, खुराचा रंग काळा असावा.
  4. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी.
  5. पाठीला बक असणाऱ्या गाई शक्यतो टाळाव्यात.
  6. चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply