Take a fresh look at your lifestyle.

बाजार सामित्यांवर राहणार वॉच; पहा कोणता मोठा निर्णय झालाय याबाबत

पुणे :

Advertisement

बाजार समित्या म्हणजे शेतकरी व व्यापारी यांच्यामधील दुवा. मात्र, येथील गलिच्छ राजकारण आणि शेतकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या बाजार समित्या म्हणजे फ़क़्त चरण्याचे कुरण बनल्या आहेत. हेच चित्र बदलण्याच्या उद्देशाने आता वर्षभरातून एकदा सहकार खात्यातर्फे याची पाहणी करण्याचा महत्वाचा निर्णय लागू होत आहे.

Advertisement

मार्केट कमिट्यांच्या कारभाराची वर्षातून एकदा तालुका निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधकांनी वार्षिक तपासणी करणे बंधनकारक आहे. त्याकडेच दुर्लक्ष होते. मात्र, आता त्याचे वेळापत्रक जारी करूनच हे घेतले जाणार आहे. त्यानुसार सध्या नाशिक जिल्ह्यात 15 बाजार समितींमध्ये तालुका निबंधक जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार तपासणी केली जात आहे.

Advertisement

तपासणीचे मुद्दे असे असतील :

Advertisement
 1. बाजार समितीस प्राप्त अधिकार कर्तव्य व शक्तीचा वापर
 2. इ-नाम अंतर्गत समितीचे कामकाज
 3. समिती आवारात सोयी सुविधा
 4. बाजार फी, देखरेख खर्च, पणन मंडळ अंशदान वसुली, कलम १२ (१) अन्वये प्राप्त मंजुरीपत्रातील अटी-शर्तींची पूर्तता आदि
 5. शेतकरीवर्गाचे हक्क, संचालक मंडळाचे कामकाज
 6. नियम व उपविधीतील तरतुदीनुसार कामकाज
 7. शेतीमालास स्पर्धात्मक दर मिळण्यासाठीचे प्रयत्न
 8. आवारात शासकीय खरेदी केंद्र सोय
 9. प्राप्त तक्रार अर्जावर केलेली कारवाई
 10. अनुज्ञाप्ती देताना तरतुदींचे पालन
 11. समितीच्या निधीची अभिरक्षा गुंतवणूक व खर्च यांची कायदा नियम व उपविधीतील तरतुदीनुसार नियोजन
 12. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका व नियमानुसार कार्यवाही  
 13. सचिव प्राप्त शक्तीचा व कर्तव्याचे पालन करणे

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply