Take a fresh look at your lifestyle.

दरवाढीचा सपाटा सुरूच; आता पेट्रोलने गाठला उच्चांक, वाचा किती रुपयांनी वाढले दर

दिल्ली :

Advertisement

मागच्या काही दिवसांपासून देशात इंधन आणि गॅस सिलेंडरची रोज थोड्याफार प्रमाणात दरवाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ सुरूच आहे. परिणामी देशांतर्गत इंधनाचे दर वाढतच आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे ३५ पैसे आणि २५ पैशांची वाढ केली आहे.

Advertisement

इंधन दरवाढीने नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सर्वसामान्य ग्राहकाच्या सहनशीलतेचा अंत पाहात असल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाच्या परिस्थितीतून नागरिक बाहेर पडत असतानाच त्यांना महाग इंधनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा येऊ लागल्या आहेत.  मुंबईत पेट्रोलचे दर ९४ रुपयांवर गेले आहेत, जे मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल दर भडकलेले आहेत. यापूर्वी मागील वर्षाच्या उत्तरार्धातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती.

Advertisement

आजच्या दरवाढीनंतर आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.१२ रुपये झाला आहे. मंगळवारी तो ९३.८३ रुपये होता. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८४.६३ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८७.६० रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७७.७३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ८९.९६ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८२.९० रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ८८.९२ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८१.३१ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९०.५३ रुपये झाला आहे तर डिझेल ८२.२२ रुपये झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply