मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला. यानंतर आठवडाभरात जवळपास अडीच हजारांनी दर कमी झाले. मात्र कालपासून सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.
स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी 10:22 वाजता पाच एप्रिल 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.25 टक्के म्हणजे 122 रुपयांची वाढ होऊन प्रती 10 ग्रॅम 48,070 रुपयांवर ट्रेंड करत होता.
आता सलग 2 दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील सोन्याच्या किंमती जागतिक ट्रेंडने प्रभावित आहेत. विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती करणे कठीण झाले आहे. याव्यतिरिक्त, जगभरात कमी व्याज दर आणि अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा सोन्यासाठी सकारात्मक असू शकतात. सध्या सोन्याचे स्थान प्रति औंस सुमारे 1900 डॉलर च्या आसपास आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!