Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही कडकनाथ कोंबडीवाले, तुम्ही जिथे शिकता, तिथले पवारसाहेब संस्थापक; राष्ट्रवादीची ‘त्यांच्यावर’ जहरी टीका

मुंबई :

Advertisement

शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते? ते कोणत्या फडात कुस्ती खेळले, पवार यांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही, असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर तुमचा मुलगा जिल्हा परिषदेत पडला, कोणाच्या बाबतीत काय बोलावं हे समजत नाही, असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी लगावला.

Advertisement

पुढे बोलताना शेख म्हणाले की, तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, तिथले पवारसाहेब संस्थापक आहेत. या वयात त्यांनी कुस्ती खेळणं सदाभाऊंना अपेक्षित आहेत का? सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, कोणाच्या बाबतीत काय बोलावं ते त्यांना समजत नाही. ते काहीही बोलू शकतात.

Advertisement

नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत :-

Advertisement

शरद पवार यांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही. ते कधी हिंद केसरी झाले होते का, ही माहिती मी जुन्या लोकांकडून घेतली, तर त्यांनीही नाही म्हणून सांगितले. लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळले असतील ते सोडा. पण तरीही ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले ना.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply