Take a fresh look at your lifestyle.

जुन्या आणि नव्या कामगार कायद्यातील फरक घ्या जाणून; किती मिळू शकतात सुट्ट्या, पगारावर कसा पडणार फरक

मुंबई :

Advertisement

सध्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कृषी आणि कामगार कायद्यांची जोरदार चर्चा आहे. कृषी कायद्यावरुन देशात आंदोलने सुरू आहेत. तर कामगार कायदा अजूनही लोकांना नेमका समजलेला नाही. सुरूवातीला कृषी कायदे आणि कामगार कायदे असे दोन्हीही मुद्दे घेऊन आंदोलन सुरू होते. नंतर मात्र या आंदोलनाचा केंद्रबिंदू कृषी कायदे झाले आणि आजही कृषी कायद्यावरूनच आंदोलन सुरूच आहे. आता मात्र कुततीच्या मुद्दयावरुन कामगार कायदे लोकांमध्ये चर्चिले जाऊ लागले आहेत.

Advertisement

केंद्राने पारित केलेल्या कामगार कायद्याचा कामगारांना मोठा फायदा मिळणार आहे. या कायद्यातील एका तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. . कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र 3 दिवस सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचार्‍यांना तब्बल 12 तास काम करावं लागणार आहे. आठवड्याचे तास आधीइतकेच असल्याने ते भरून द्यावे लागणार आहेत.

Advertisement

पगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची मागणी 22 हजार रुपये होती. शासनाने प्रत्यक्षात 18 हजार रुपये दिलेत. कामगार संघटनांची मागणी 15 हजार आहे. सरकारने केवळ 6098 रुपये वेतन जाहीर केले. किमान वेतन, बोनस, समान कामाला समान वेतन कायदा, त्याचे अनुषंगिक खर्च या बाबींची ही संहिता आहे. चौघांच्या कुटुंबाला अन्न, कपडे, घरभाडे, वीज, इंधनावरील शास्त्रोक्तपणे महिन्याचे किमान वेतन सुप्रीम कोर्टाने सुचविलेल्या वाढींसह 20,861 रुपये येते. 

Advertisement

आरोग्य, वर्किंग कंडिशन विधेयक, कामगार जीवितांच्या सुरक्षिततेच्या हक्कांसंदर्भातील 13 कायद्यांचे एकत्रीकरण केले. बिडी, खाण, डॉक, कन्स्ट्रक्शन, कॉन्ट्रॅक्ट, ट्रान्स्पोर्ट इ. मधील त्यांचे सर्व कायदे प्रत्यक्षात पातळ आणि मोडतोड केले आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply