मुंबई :
सध्या कृषी कायद्यावरुन देशात गडबडगोंधळ सुरू आहेत. सुरूवातीला कृषि कायदे आणि कामगार कायदे असे दोन्हीही मुद्दे घेऊन आंदोलन सुरू होते. नंतर मात्र या आंदोलनाचा केंद्रबिंदू कृषी कायदे झाले आणि आजही कृषी कायद्यावरूनच आंदोलन सुरूच आहे. अशातच आता पुन्हा एकदा सुट्ट्यांच्या विषयावरुन नव्या कामगार कायद्यांची चर्चा सुरू झाली आहे.
या नवी कामगार कायद्यात महिलांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. महिलांनाही पुरुषांइतकेच वेतन देण्याबरोबर डिजिटल पद्धतीने वेतन देण्याची तरतूद ही करण्यात येणार आहे. आतापर्यंत महिलांना खाण उद्योगासारख्या काही क्षेत्रात काम करण्याची परवानगी नव्हती, नव्या कायद्यानुसार महिलांना आता सर्वच क्षेत्रात काम करता येणार आहे.
केंद्राने पारित केलेल्या कामगार कायद्याचा कामगारांना मोठा फायदा मिळणार आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी कर्मचार्यांना तब्बल 12 तास काम करावं लागणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!