Take a fresh look at your lifestyle.

बिजनेस इन्फो | उद्योजक म्हणजे कल्पकतेला प्रयत्नांची जोड; आणि आणखीही ‘असे’च काही..

मराठी माणूस म्हणजे नोकरीचा चाहता, असेच महाराष्ट्रात तरी चित्र आहे. मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी आणि हैदराबादी मंडळींच्या तुलनेते व्यवसायात मराठी माणूस खूप कमी दिसतो. नाहीच नोकरी लागली तर व्यवसायाच्या फंदात पडलेले आणि मग यशस्वी झालेलेही मराठी मानसं आहेत म्हणा. पण त्यांची टक्केवारी खूपच नगण्य. याला कारण आहे, पालकांची आणि एकूण समाजाची नकारात्मकता. शेती आणि व्यवसाय या दोन्हीबाबत ती सारखी आहे.

Advertisement

लेखन : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

Advertisement

उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे १९९० च्या अगोदर या महाराष्ट्रात सर्रास म्हटले जात. आता त्याच्या उलट परिस्थिती आहे. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असे चक्र फिरले आहे. अपवाद वगळता अजूनही हेच चित्र आहे. मात्र, तरीही दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्यांची टक्केवारी कमी होत असल्याने आता कुठे व्यवसायाला जरा बरे दिवस येतील असे दिसते. तर, आपण या लेखमालेत काही शेती हा विषय हाताळणार नाहीत. आपण फ़क़्त व्यवसाय हाच घटक यात पाहणार आहोत. त्यामुळे शेती हा इतर तज्ञांच्याकडे शाबित ठेऊया..

Advertisement

तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, उद्योजकता म्हणजे काय, असे प्रश्न आपल्याला आणि समाजाला आहेतच. थोडक्यात आणि मोजक्या शब्दात परफेक्ट सांगायचे म्हणजे आर्थिक संधीचा विकास करणे म्हणजे उद्योजकता. त्यासाठी जिद्द, कष्ट, चिकाटी, सातत्य यासह वेगळे असे काही गुण लागतात. मोठ्या आर्थिक संधीचा विचार करणारच उद्योजक किंवा बिजनेसमन होऊ शकतो. मग एखादा त्यात पडून मोठे स्वप्न पाहतो, किंवा काहीजण अगोदरच मोठे स्वप्न पाहून व्यवसायाच्या फंदात पडतात. मात्र, यश मिळवण्यासाठी यशाची भूक लागते हे नक्कीच.

Advertisement

संधी शोधणारा उदयोजक अथक प्रयत्न व कल्पकता यामुळेच यशस्वी उदयोजक बनतो. जशी नोकरी आपल्याला मिळवावीच लागते. त्याच पद्धतीने आपला व्यवसायही आपला आपल्याला निवडावा लागतो आणि पुढे न्यावा लागतो. इतरांनी सल्ले दिले आणि त्यांच्या जीवावर पुढे जाण्याच्या विचाराने केलेले व्यवसाय मग तितके पुढे जातात असेही नाही.

Advertisement

आपली अंतरप्रेरणा जागृत करूनच व्यवसाय निवडावा. सरकारी अनुदानाची योजना पाहून केलेला, किंवा पाहुण्यांच्या वा मित्रांच्या भरवशावर उद्योग व व्यवसाय सुरू होऊ शकतो. मात्र, तो तितका मोठा होत नाही. अशावेळी सरड्याची धाव कुंपणापर्यंत राहते. त्यासाठी अभ्यास करून आणि आपला आवाका लक्षात घेऊन स्वतःच एखाद्या छोट्या किंवा मोठया उद्योगाची संधी शोधवी. त्यासाठी नवीन कल्पना असल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जावे. कल्पना विकसित करतानाच टीम बिल्डींग करणे. उद्योगाचे नेतृत्व करून आर्थिक व्यवहार हाताळणे ही एक वेगळी कला आहे. दोन्ही कला एकालाच असतील असे नाही. त्यामुळे अशावेळी योग्य पार्टनर निवडून पुढे जावे.

Advertisement

आपल्या उद्योगाची मालकी मिळवणे यापेक्षाही स्वतःमधील उद्योजकतेची प्रेरणा जागृत ठेऊन व्यवसायाला पुढे नेण्याचे कौशल्य जास्त महत्वाचे असते. त्यासाठी सगळेकाही आपल्याला यावेच असेही काही नाही. इतर चांगल्या आणि विश्वासू लोकांची टीम बांधणी करून व्यवसाय पुढे न्यावा लागतो. त्यासाठी पैसे लागतात, मात्र पैसे लागतातच असेही नाही. कारण, आपल्या कल्पनेला सत्यात उतरवण्याची उर्मी असल्यास आता बाजारात पैसे लावणारेही अनेकजण भेटतात. फ़क़्त आपली व्यावसायिक कल्पना मोठी असावी आणि इतरांना त्यातला झीस्ट समजावून सांगण्याची कला आपल्याला लागते.

Advertisement

(भाग 2)

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो.  9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply