Take a fresh look at your lifestyle.

विखे-पवार युतीमुळे ‘त्या’ भाजप नेत्यांची होतेय घुसमट; वाचा, का दिला रोहित पवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा

अहमदनगर :

Advertisement

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणात सोयिस्कर भूमिकेसाठी जेष्ठ नेते शरद पवार ओळखले जातात. आता नातू रोहित पवारही सोयिस्कर भूमिका घेऊ लागल्याचे समोर आले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत रोहित पवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा देत पक्ष विचारांना तिलांजली दिली आहे.

Advertisement

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जगन्नाथ राळेभात पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बसणार आहेत. मात्र त्यांचा हा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे सोपा झाला आहे. पवार-विखे यांच्या या युतीमुळे जिल्ह्याच्या राजकरणातील वारे फिरले आहे. भाजपच्या जुन्या नेत्यांची विखेंमुळे घुसमट होऊ लागली आहे.

Advertisement

रोहित पवारांनीही याला ‘बेरजेचे राजकारण’ असे गोड लेबल लावून चक्क पक्षाच्या विचारांना मूठमाती देत भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यभरात रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. ‘आम्ही इकड भाजपच्या विरोधात घसा कोरडा होईस्तोवर बोलायचं आणि रोहितदादांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यायचा’, अशा प्रतिक्रिया येत आहेत.   

Advertisement

विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. विखे यांच्या पक्षप्रवेशाला राम शिंदे तसेही उत्सुक नव्हतेच. काय होणार यांची त्यांना कल्पना होतीच. मात्र आता विखे- पवार यांच्या छुप्या युतीमुळे पवार कर्जतचे आणि विखे हे जिल्हयाचे निर्विवाद वर्चस्व करतील. मात्र आता पुन्हा एकदा सुजय विखे यांनी शिंदे यांचे विरोधक रोहित पवार यांच्याशी हात मिळवणी करून शिंदे यांचा गेम केल्याने शिंदे यांच्यासमोर राजकीय संकट निर्माण झालं आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply