कोट्यावधी युजर्स असणार्या ‘त्या’ अॅपचा घोळ; गुगलने ‘ती’ केली कारवाई; मोबाइलमध्ये असल्यास लगेच करा डिलीट
मुंबई :
आपली जीवनपद्धती सहज आणि सुकर बनवण्याच्या नादात आपण जगाने विसरून चाललो आहे. डिजिटल जगाने आपल्या जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला असला तरीही आता लोकांना तो नकोनकोसा झाला आहे. रोजचं कुठे ना कुठे वैयक्तिक माहिती चोरी होते, आर्थिक घोटाळे वाढतात, सायबर क्राइमची प्रकरणे वाढत चालली आहेत. अशातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे.
कोड स्कॅन करणारी अनेक अॅप्स सध्या वापरात आहेत. मात्र बारकोड स्कॅनर हे अॅप अनेक लोकांना वापरताना आपण पाहिले आहे. गेल्या काही वर्षात या अॅपला मोठी लोकप्रियता मिळाली. गेली अनेक वर्षं हे अॅप चांगलं होतं; पण अलीकडे त्याद्वारे व्हायरस पसरत असल्याची माहिती मालवेअरबाइट्स या सायबर सिक्युरिटी कंपनीने दिली होती.
आता या अॅपवर गुगलने कारवाई केली असून आता हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरूनच हटवण्यात आलं आहे; मात्र ज्या युझर्सनी ते डाउनलोड केलं होतं, त्यांच्यासाठी अजूनही धोका टळलेला नाही. तुम्हीही हे अॅप कधी डाउनलोड केलं असलंत, तर स्मार्टफोनवरून ते तातडीने अनइन्स्टॉल करा.
LavaBird Ltd या डेव्हलपर कंपनीने तयार केलेल्या या अॅपमध्ये व्हायरस असल्याचे समोर आले आहे. बारकोड स्कॅनर हे सुरुवातीला एक सर्वसाधारण, नेहमीसारखं अॅप्लिकेशन होतं; मात्र गेल्या वर्षी त्याचा एक अपडेट आल्यानंतर ते हानिकारक स्वरूपात बदललं, अशी माहिती सिक्युरिटी फर्मने दिली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य