Take a fresh look at your lifestyle.

आता शेतकर्‍यांना मिळणार तीन लाखांचे बिनव्याजी कर्ज; वाचा कसे आणि कुठून मिळणार कर्ज

मुंबई :

Advertisement

एका बाजूला कृषी कायद्यांसाठी शेतकरी लढत आहेत. केंद्र सरकारने अजूनही नमते घेतलेले नाही. दरम्यान राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार आहे.

Advertisement

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे ज्या शेतकर्‍यांची कर्जमाफी झालेली नाही त्यांनाही यांचा तातडीने लाभ मिळू शकणार आहे. सहकार आणि कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

Advertisement

हा निर्णय महत्वाचा यासाठी ठरणार आहे की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. यंदा मात्र खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Advertisement

दरम्यान बैठकीला उपस्थित असलेले मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी भुसे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply