Take a fresh look at your lifestyle.

नितिन गडकरी आता कधीच नाही वापरणार बुलेट कार; कारण वाचून वाटेल आश्चर्य

नागपुर :

Advertisement

नितिन गडकरी म्हणजे ‘बोले तसा चाले’ अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रात अशा प्रकारची माणसं फारच कमी पहायला मिळतात. केंद्रीय मंत्री असूनही आता नितिन गडकरी यांनी बुलेटप्रूफ कार न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गडकरी जेव्हा नागपुरात असतील तेव्हा तेव्हा ते आता इंधनाच्या कार ऐवजी इलेक्ट्रिक कार वापरणार आहेत.

Advertisement

गेल्या वर्षभरात भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लॉंच झाल्या. त्यातच काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी ‘देशात आगामी काळात इलेक्ट्रिक कारला फार महत्व येणार  आहे’, असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आधी स्वत: पासून सुरुवात करायचे त्यांनी ठरवले आहे.

Advertisement

आजपासून गडकरी यांनी आपली डिझेल कारला दूर सारत इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, देशात भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे. त्याचाच एक भाग म्हणून बुलेटप्रुफ गाडी सोडून नागपुरात इलेक्ट्रिक गाडी वापरणार आहे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी याव्या यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे याला पर्याय म्हणून अॅल्यूमिनियम वा स्टिल आयर्न वापरता येईल का याविषयी विचार सुरू आहे. या इंधनामुळे ८ लाख कोटींची आयात संपेल. हळूहळू नागपुरात सीएनजींचे पंप सुरू करून प्रदुषणमुक्त करू.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply