Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीतील ‘हे’ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता; नाना पटोलेंना मिळणार आणखी मोठी संधी

मुंबई :

Advertisement

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केले. नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत आणि 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

Advertisement

एवढे बदल काँग्रेसमध्ये करूनही आता नव्याने काही बदल आपल्यासमोर येणार आहेत. नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत अचानक दिल्ली दरबारी दाखल झाल्याने राऊत यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

अध्यक्षपदासोबत मंत्रीपद देण्याची मागणी पटोले यांनी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कॉँग्रेसच्या मंत्र्यांत खांदेपालट केला जाण्याची शक्यता आहे. ऊर्जा खाते हे पटोले यांना देऊन राऊत यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply