Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या काळात 12 वर्षाच्या मुलाने सुरू केले ट्रेडिंग; एका खास ‘आयडिया’मुळे झाला मालमाल

मुंबई :

Advertisement

दक्षिण कोरियामधील एका 12 वर्षाच्या मुलाने गेल्या वर्षी कोरोना साथीच्या काळात हौशी म्हणून ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली होती आणि आता त्याला गुंतवणूकीवर तब्बल 43 टक्के परतावा मिळाला आहे. 12 वर्षीय क्वॉन(Kwon) या मुलाचा प्रत्येक दिवस आता व्यवसायाच्या बातम्यांसह सुरू होतो आणि त्याचे स्वप्न पुढील वॉरेन बफे बनण्याचे आहे. गेल्या वर्षी क्वॉनने त्याच्या आईला रिटेल ट्रेडिंग अकाउंट उघडण्यास सांगितले.

Advertisement

त्याने 182.06 कोटी रुपयांची केलेली बचत शेअर मार्केटमध्ये वापरण्यास सुरुवात केली आणि त्याने 43 टक्के परतावा मिळविला. जेव्हा दशकाच्या सर्वात मोठ्या घसरणीनंतर कोरियाचा बेंचमार्क कोस्पी निर्देशांक पुन्हा सुधारू लागला तेव्हा त्याने व्यापार सुरू केला. या गुंतवणूकीविषयी तो त्याच्या पालकांशी बोलला. त्याने मार्केट तज्ञांवर विश्वास दाखवला. बाजारातील तज्ज्ञांनी टीव्हीवर बर्‍याच वेळा सांगितले की, अशा गुंतवणूकीची संधी दहा वर्षांतून एकदा येते. क्वोनने म्हटले की, त्याचे रोल मॉडेल दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे आहेत.

Advertisement

बरेच गुंतवणूकदार शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी धोरण आखतात. क्वोन याने म्हटले की, शॉर्ट टर्म ऐवजी लॉन्ग टर्म गुंतवणूकीवर आपले लक्ष केंद्रित करायला हवे. आपली गुंतवणूक 10 ते 20 वर्षे ठेवावी जेणेकरुन त्याचे परतावे शक्य तितके वाढवता येऊ शकतात. दक्षिण कोरियामध्ये क्वॉन सारखे बरेच लोक आहेत, ज्यांनी नुकतीच गुंतवणूक सुरू केली आहे, ते भेटवस्तू, मिनी कार खेळणी व वेंडिंग मशीनमधील पैशांच्या व्यवसायातून ब्लू चिप शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. कोरोना साथीच्या काळात, त्यांच्या गुंतवणूकीमुळे किरकोळ व्यापारात मोठी वाढ झाली होती. मागील वर्षी 2020 मध्ये झालेल्या व्यवसायात दक्षिण कोरियामध्ये सुमारे दोन तृतीयांश टीएनएजर्स किंवा तरुण गुंतवणूकदार होते. 2019 मध्ये अशा तरुण गुंतवणूकदारांचा वाटा 50 टक्क्यांपेक्षा कमी होता.

Advertisement

बुधवारी जाहीर झालेल्या बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 मध्ये 15-29 वर्षे वयोगटातील बेरोजगारीचा दर 27.2 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. दक्षिण कोरियाचे व्यावसायिक संशोधक मिन सुक वियन म्हणतात की, महाविद्यालयीन पदवीधरांनंतर नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत आणि यामुळे बरेच लोक शक्य तितक्या लवकर उत्पन्नाचे पर्याय शोधत आहेत.त्यामुळे तिथे शेअर मार्केटमध्ये लोकांना चांगल्या संधी आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply