Take a fresh look at your lifestyle.

पुढच्या महिन्यात येतेय ही दमदार e-SUV; अवघ्या 5 सेकंदात घेणार 100 चा स्पीड, वाचा दमदार फीचर्सविषयी

मुंबई :

Advertisement

पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात इलेक्ट्रिक कारच्या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. यावेळी एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही दिग्गज कंपनी घेऊन येणार आहे. तगडे फीचर्स असणारी

Advertisement

अवघ्या 5 सेकंदात 100च स्पीड घेणारी गाडी जगुआर लँड रोव्हर ही कंपनी (JLR) घेऊन येत आहे. सोमवारी जेएलआरकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमची ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही  I-PACE ही 9 मार्च रोजी लाँच केली जाईल. कंपनीने गाडी लॉंच करण्याआधीच देशात बुकिंग सुरू केले आहे.

Advertisement

जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी यांनी सांगितले की, लँड रोव्हर डिफेंडरच्या डिजिटल लाँचिंगला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आम्ही भारतात आणखी एका डिजिटल लाँचिंगबद्दल उत्सुक आहोत. यावेळी ते जोश जग्वार  I-PACE बद्दल बोलत होते.

Advertisement

ही गाडी विशेषत: टिकाऊ इकोस्टिमसाठी डिझाइन केलेली आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या गतिशीलतेची प्रभावी यंत्रणा वापरली गेली आहे.

Advertisement

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जग्वार  I-PACE मध्ये 90 किलोवॅट क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरी आहे. यात 295 किलोवॅट वीज आणि 696 एनएम टॉर्क तयार होते. I-PACE ही गाडीच्या ग्राहकांना ऑफिस आणि होम चार्जिंग सोल्यूशन देण्यासाठी कंपनीने टाटा पॉवरशी करार केला आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply