Take a fresh look at your lifestyle.

बजेटनंतर 9 दिवसात सोने जवळपास 3 हजारांनी स्वस्त; वाचा, महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरातील भाव

मुंबई :

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. 9 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त घसरण झालेली आहे.

Advertisement

आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने लोकांचे लक्ष सोने खरेदीवर आहे. भविष्यात अजूनही दर कमी होण्याची शक्यता तज्ञ मंडळींनी सांगितलेली आहे.   

Advertisement

वाचा, संपूर्ण महाराष्ट्रात कुठे, किती आहे दर

Advertisement
अ.क्र.शहर31 जानेवारी रेटआजचा रेट
1.जळगाव:50 हजार 703 प्रतितोळा48 हजार 200 प्रतितोळा  
2.  मुंबई46 हजार 744 रुपये प्रतितोळा45 हजार 21 रुपये प्रती तोळा
3.पुणे49 हजार 600 प्रतितोळा48 हजार 900 प्रतितोळा
4.औरंगाबाद48 हजार 980 प्रतितोळा47 हजार 512 प्रतितोळा
5.कोल्हापूर50 हजार 700 प्रतितोळा48 हजार 900 प्रतितोळा
6.नागपूर49 हजार 100 प्रतितोळा49 हजार 50 प्रति तोळा  

नाशिकमध्ये 48,800 प्रतितोळा, सोलापूरमध्ये 48 हजार 360 रुपये प्रतितोळा तर रत्नागिरीमध्ये 48 हजार 760 प्रतितोळा भाव चालू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची किंमत वाढत चालली आहे. म्हणूनच सोन्याचे दर सतत घसरत आहेत. परदेशी बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1800 डॉलरवर आली आहे.   
संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply