Take a fresh look at your lifestyle.

5 वर्षात पंतप्रधान मोदींनी दिली 58 देशांना भेट; ‘त्यासाठी’ खर्च केले एवढे कोटी रुपये, आकडा वाचून व्हाल शॉक

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्‍यावरुन त्यांच्यावर नेहमीच टीका होत असते. अर्थात गेल्या वर्षापासून कोरोनामुळे मोदीजी कुठेच गेलेले नाहीत. अर्थात लोक त्यावरूनही त्यांना ट्रोल करत असतात. मात्र 2015 नंतर मोदीजींनी तब्बल 58 देशांना भेट दिली. आणि यासाठी त्यांनी 517 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अर्थात यापेक्षा वेगळी आकडेवारीही आपल्यासमोर आलेली आहे. तीही पुढे वाचा.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधानांचा ब्राझीलचा अखेरचा परदेशी दौरा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये होता. नोव्हेंबरच्या सुरूवातीला ते थायलंडलाही गेले होते. कोरोना साथीच्या आजारामुळे पंतप्रधान मोदींनी कोणत्याही देशाचा दौरा केलेला नाही.

Advertisement

केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये म्हटले आहे की, जून 2014 पासून पंतप्रधानांच्या विदेश दौर्‍यावर 2,000 कोटी रुपये खर्च झाले. यात चार्टर्ड उड्डाणे, विमानांची देखभाल व हॉटलाईन सुविधांचा खर्च समाविष्ट आहे.

Advertisement

तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 15 जून 2014 ते ३ डिसेंबर 2018 या कालावधीत पंतप्रधानांच्या विमानांच्या देखभालीसाठी 1,583.18 कोटी रुपये, चार्टर्ड फ्लाइट्सवर 429.25 कोटी रुपये, तर हॉटलाईनवर एकूण 9.11  कोटी रुपये खर्च करण्यात आले.       

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply