Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. गुड न्यूजच की.. हफ्ते मे 4 दिन काम 3 दिन आराम; पहा काय होतोय निर्णय ते

दिल्ली :

Advertisement

सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील आस्थापनेत नोकरीवर असलेल्यांना आठवड्यात 5 दिवस काम आणि 2 दिवसांचा आराम अशी सोय आहे. मात्र, त्यातही आणखी दिलासा देणारी बातमी आलेली आहे. होय, यापुढे 4 दिन काम 3 दिन आराम ही अनोखी योजना नोकरदार मंडळींसाठी खुली होण्याची शक्यता आहे.

Advertisement

केंद्र सरकार लवकरच नोकरदार मंडळींना ही चांगली बातमी देऊ शकते. त्यात कंपन्यांना आठवड्यातून चार दिवस लवचिकतेने काम करण्याची परवानगी मिळू शकते. मात्र, यासाठी नोकरदारांना जास्तीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागेल.

Advertisement

कामगार सचिव अपूर्व चंद्र यांच्या मते, आठवड्यातून 48 तास काम करण्याचा नियम कायम राहील. परंतु कंपन्यांना तीन शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्यानुसार 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांना आठवड्यातून चार दिवस काम करावे लागेल. त्याचप्रमाणे, 10 तासांच्या शिफ्टमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम करावे लागेल. तर, आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या सर्वांना आठवड्यातून सहा दिवस काम करावे लागणार आहे.

Advertisement

तीन शिफ्टबाबत कर्मचारी किंवा कंपन्यांवर सरकारकडून दबाव आणला जाणार नाही. ही तरतूद कामगार संहितेचाच एक भाग आहे. बदलत्या कार्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी ही तरतूद केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल, असे सरकारला वाटत आहे.

Advertisement

अशा नियमांचा फायदा कंपन्यांनाही होणार आहे. यामुळे कर्मचारी अधिक सक्रिय राहतील. सध्या आठ तासांच्या शिफ्टद्वारे आठवड्यातून सहा दिवस काम केले जाते आणि कर्मचार्‍यांना एक दिवसाची सुट्टी दिली जाते. प्रस्तावानुसार, कोणताही कर्मचारी कमीतकमी अर्ध्या तासाच्या अंतराशिवाय पाच तासांपेक्षा जास्त वेळ अविरतपणे काम करू शकत नाही. मात्र, आता त्यात बदल होतील असे स्पष्ट संकेत आहेत.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply