Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारचा नवा नियम; नव्या कामगार कायद्यानुसार आठवड्यात मिळणार 3 सुट्ट्या पण…

दिल्ली :

Advertisement

सध्या कृषी कायद्यावरुन देशात गडबडगोंधळ सुरू आहेत. सुरूवातीला कृषि कायदे आणि कामगार कायदे असे दोन्हीही मुद्दे घेऊन आंदोलन सुरू होते. नंतर मात्र या आंदोलनाचा केंद्रबिंदू कृषी कायदे झाले आणि आजही कृषी कायद्यावरूनच आंदोलन सुरूच आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

केंद्राने पारित केलेल्या कामगार कायद्याचा कामगारांना मोठा फायदा मिळणार आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी कर्मचार्‍यांना तब्बल 12 तास काम करावं लागणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

Advertisement

अद्याप या विषयाबाबत कर्मचार्‍यांशी आणि कंपन्यांची बोलणे झाले नसल्याचे केंद्राकडून समजत आहे. मात्र लवकरच यासबंधित निर्णय घेतला जाईल. 1 एप्रिल 2021 पासून नवीन 4 कामगार कायदे लागू होणार असल्याची माहिती समजत आहे.   

Advertisement

असा आहे सुट्ट्यांचा हिशोब:-

Advertisement
  1. कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावं लागणार असून आठवड्यात काम करण्याची मर्यादा 48 तासांची आहे. त्यामुळे 12 तास काम केल्यास 4 दिवस काम करून 3 दिवस सुट्टी देता येऊ शकते.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply