Take a fresh look at your lifestyle.

26 जानेवारी हिंसा प्रकरणातील मुख्य सुत्रधार दीप सिद्धूला अटक; दिल्ली पोलिसांनी ठेवला होता ‘एवढा’ इनाम

दिल्ली :

Advertisement

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणी दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी ही माहिती दिली. सिद्धूच्या माहितीसाठी पोलिसांनी 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. दुपारी पत्रकार परिषद घेऊन दिल्ली पोलिस याबाबत अधिक माहिती देतील.

Advertisement

पोलिस सूत्रांनी सांगितले की, 26 जानेवारीला या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार सिद्धू याला चंदीगड ते अंबाला दरम्यान झिरकापूर येथून अटक करण्यात आली होती. 26 जानेवारी रोजी हजारो शेतकरी गाझीपूर सीमेवरुन आयटीओला पोहोचले, तेथे ते पोलिसांशी भिडले. त्यापैकी बहुतेक जण लाल किल्ल्यावर ट्रॅक्टरने पोहोचले आणि स्मारकाच्या आत पोहोचले आणि तेथे धार्मिक झेंडा फडकावला.

Advertisement

या प्रकरणात असे बोलले जात आहे की, दीप सिद्धू यांनी निदर्शकांना चिथावणी देण्याचे आणि भडकवण्याचे काम केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू हा संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे.

Advertisement

दीप सिद्धू व्यतिरिक्त जुगराग सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्यावरही प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यापूर्वी रविवारी, 26 जानेवारी हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी इतर काहींना अटक केली. पोलिसांनी सुखदेवसिंग यांना चंदीगड येथून अटक केली. आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात 127 लोकांना अटक केली आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारात सुमारे 400 पोलिस जखमी झाले होते. तर ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply