Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी… आता विना ड्राइविंग टेस्ट मिळणार ड्राइविंग लायसन्स; वाचा, सरकारने केलीय काय तयारी

मुंबई :

Advertisement

येणार्‍या काळात ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. आता ही बातमी अनेकांना आनंद देणारी आहे. कारण अनेक लोक गाडी चांगली चालवतात मात्र टेस्टच्या वेळी भीती वाटल्याने नापास होतात. आता त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला टेस्ट द्यायची गरज लागणार नाही. मात्र त्यासाठी एक गोष्ट करणे बंधनकारक आहे. आपल्याला मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग सेंटरवरून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करावे लागेल, या एका अटीवर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स विना टेस्ट मिळेल.

Advertisement

रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मान्यता प्राप्त ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्रांबाबतची प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने या अधिकृत केलेल्या केंद्रांकडून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले तर ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करताना त्याला ड्रायव्हिंग टेस्टमधून सूट देण्यात येईल. जनतेच्या सूचना मिळाव्यात यासाठी मसुदा अधिसूचना मंत्रालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार औपचारिकरित्या हा नियम लागू करेल.

Advertisement

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे इंडस्ट्रीला कुशल चालक मिळू शकतील. यामुळे क्षमता वाढेल तसेच रस्ते अपघातांचे प्रमाणही कमी होईल. यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की, मान्यताप्राप्त केंद्रांकडून वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता इतकी चांगली असेल का, जी प्रत्येक मानकांची पूर्तता करू शकेल?

Advertisement

हे लक्षात घेता मंत्रालयाने अशा आवश्यकता व कृती प्रस्तावित केल्या आहेत, ज्या या केंद्रांची पूर्तता करणे व त्यांचे पालन करणे बंधनकारक असेल. म्हणजेच जे लोक प्रमाणित केंद्रांकडून ड्राइविंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करतात त्यांना ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करताना चाचणीतून सूट देण्यात येईल.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply