रविशकुमार थॉट : अरे, लोकशाही म्हणजे अंतर्वस्त्रे नव्हेत, तो पांढराशुभ्र सदरा आहे.. अवघ्या मानवजातीचा..!
बातमी म्हणजे केवळ आतल्या बातम्या बाहेर आणणे होय. ज्या बातम्या बाहेर आल्या नाहीत त्या बाहेर येऊ देऊ नका, असे काम राजकारण्यांचे व सत्ताधारी किंवा व्यवस्थेचे असते. जेव्हा सीएनएन वेबसाइटवर शेतकरी चळवळीची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा ती जगभरातील वाचकांनी पाहिली. न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टमध्येही शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दिसल्या. त्यावेळी आमच्या चित्रपट कलाकार आणि खेळाडूंनी एक चांगले काम केले की, वॉशिंग्टन पोस्ट,न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएन यांना ‘या’ बातम्या प्रसारित केल्याबद्दल खडसावले नाही.
लेखक : रविशकुमार, सिनिअर एडिटर, एनडीटीव्ही इंडिया
स्वैर अनुवाद : महादेव पांडुरंग गवळी (संपादक, राज्यकर्ता)
भारतातील आंदोलने आणि त्याबद्दलच्या बातम्या दाखवल्याने देशातील आतील माहिती बाहेर जाते असे या सर्व सेलिब्रिटीजणांचे म्हणणे आहे. या युक्तिवादानुसार भारतीय न्यूज वेबसाईटसुद्धा यूएस व लंडनसाठी बंद केली पाहिजे. जेणेकरून कोणालाही काहीही माहिती मिळणार नाही.
आपण सर्वांनी एक गाणे अनुभवले आहे, ‘अंदर बात चली है पता चला है । चड्ढी पहन कर फूल खिला है’. हे चित्रपट कलाकार आणि खेळाडू ‘या आतल्या मुद्द्यावर’ गप्प आहेत. पण, पॉपस्टार रिहाना यांनी शेतकरी चळवळीवर प्रसिद्ध झालेली बातमी ट्वीट केली. मग या प्रत्येकाने ट्विट्सची राळ उडवली. जो तो म्हणतो की ही ‘अंतर्गत बाब’ आहे. लक्स विनसने तिच्या बनियानसाठी टॅगलाइन बनविली की, अंदर की बात है… अपना लक पहनके चले..!
पॉप स्टार रिहानाच्या ट्विटमुळे सरकार इतके हलले की, बर्याच खेळाडू आणि कलाकार मंडळीना बोलावं लागलं. ते असं बोलू लागले आहेत की, दुसऱ्या कुणाचे बनियन घालून आले आहेत.. माझा मुद्दा समजतो का? लोकशाही ही काही अंतर्वस्त्र नसते, लोकशाही हा पांढरा शर्ट असतो. जो बाहेरून घातला जातो. लोकशाही भावना फक्त आपल्या देशासाठी नसून इतर देशांसाठीसुद्धा असते. अर्थात संपर्ण मानवजातीसाठीच.. लोकशाहीवर विश्वास ठेवणारा नागरिक खरोखरच जागतिक नागरिक आहे.
(फेसबुक पेजवरून साभार)
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!