Take a fresh look at your lifestyle.

परीक्षांच्या तयारीतून तरुणांनी आयुष्य जगण्याचं शहाणपण शिकावं : किशोर रक्ताटे

अहमदनगर :

Advertisement

स्पर्धा परीक्षार्थींनी वेळ गेल्यानंतर नाही तर वेळे आधी शहाणं झाल पाहिजे. आपण आपल्या क्षमतांच योग्य मूल्यमापन केले पाहिजे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून आयुष्य जगण्याच शहाणपण मिळण्यासाठी केवळ परीक्षे पुरता नाही तर व्यापक हेतूने अभ्यास करावा, असं प्रतिपादन स्पर्धा परीक्षा समुपदेशक तथा राजकीय सल्लागार किशोर रक्ताटे (पुणे) यांनी केले आहे. 

Advertisement

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह या संवाद कार्यक्रमात किशोर रक्ताटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Advertisement

रक्ताटे यावेळी म्हणाले की, राज्यसेवा, केंद्रीय सेवा या स्पर्धा   परीक्षां व्यतिरिक्त देखील करिअरच्या इतर अनेक संधी विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. त्या संधींसाठी देखील विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार ठेवायला पाहिजे. कारण सगळ्याच क्षेत्रात चांगल्या माणसांची आज गरज आहे. आपण त्यासाठी पात्र आहोत हे मात्र विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. 

Advertisement

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना गांभीर्यपूर्वक दोन वर्षांमध्ये पूर्ण ताकदीनिशी अभ्यास करावा. पण यापेक्षा जास्त वेळ न घालवता इतर संधी पण आजमावता आल्या पाहिजेत. अभ्यास करताना आणि आयुष्य जगताना व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांना यश हमखास मिळते. आपल्या यशाची व्याख्या आपण स्वतः ठरवली पाहिजे. पण ती ठरवत असताना आनंद नेमका कशात आहे याचा देखील शोध आपल्याला घेता आला पाहिजे, असे रक्ताटे यावेळी म्हणाले. 

Advertisement

यावेळी प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे यांनी केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ.बाळासाहेब पवार, प्रा. डॉ. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप, कु.किरण वाडेकर, योगेश जस्वाल, सचिन वारुळे,धुळाजी महारनवर, कु. शामल पवार यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी काम पाहिले. 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply