Take a fresh look at your lifestyle.

विखेंचा पवारांना झटका; एकाकी असूनही जिल्हा बँक निवडणुकीत विखे गट आघाडीवर..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे एकाकी परंतु दमदार झुंज देत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची एकी असूनही आतापर्यंत या निवडणुकीत 19 पैकी तबल 3 जागा विखे गटाने बिनविरोध खिशात टाकल्या आहेत.

Advertisement

राहता येथून अण्णासाहेब म्हस्के यांना बिनविरोध निवडून आणण्यात विखे गटाला यश आलेले होते. आता पाथर्डी येथून आमदार मोनिका राजळे आणि जामखेड येथून जगन्नाथ राळेभात यांनीही बिनविरोध संचालक होण्यात यश मिळवले आहे. अशा पद्धतीने या तिन्ही जागा विखे गटाने ताब्यात घेऊन पवार-थोरात गटाला आव्हान दिले आहे.

Advertisement

राष्ट्रवादीकडून आतापर्यंत फ़क़्त शेवगाव येथील माजी आमदार चंद्रशेखर घुले हेच बिनविरोध संचालक झालेले आहेत. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊनही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी विखे यांना एकाकी सोडल्याचे चित्र आहे. आता अर्ज माघार घेण्यासाठी फ़क़्त 2 दिवस आहेत. त्यात कर्डिले बिनविरोध होतात की, पुन्हा भाजपच्या गोटात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply