Take a fresh look at your lifestyle.

‘असावा सुंदर स्वप्नातील चॉकलेटचा बंगला’ ते ‘चॉकलेट डे’ : वाचा, कसा होता चॉकलेटचा प्रवास

चॉकलेट म्हटले की, लहान मुलांपासून ते प्रेमी युगूलांपर्यंत असणारा हा प्रवास थांबत नाही. मात्र या सगळ्या दिवसांना जागतिक बाजारपेठेणे सुसंगत जोडत आपलं मार्केट पद्धतशीर कसं मोठं केलं ही एक भन्नाट गोष्ट आहे. आपल्याला माहीत नसतं, त्या नावाचे चॉकलेट लहान मुलांना माहीत असतं. इतकेच काय तर हल्ली प्रेम व्यक्त करायचे म्हटले की, चॉकलेट हे गिफ्ट म्हणून, नात्यातील गोडवा वाढवा म्हणून द्यावं लागतं.  

Advertisement

रुपयाला पार्लेजीचे येणारे चार चॉकलेट खाऊन मोठी झालेली ९० च्या दशकातील ही पिढी आज मैत्रिणीला, प्रेयसीला वाढदिवसाला भेटायला जाताना २००-४०० ची कॅडबरी घेऊन जातात हे जरा विशेषच.

Advertisement

आज चॉकलेट डेच्या निमित्ताने आपण जाणून घेवूयात चॉकलेटचा प्रवास कुठून सुरू झाला आणि आता कुठेपर्यंत विस्तारीत झाला.

Advertisement

किपशळ हे विषुवृत्तीय प्रदेशातील कोको झाडाच्या बिया पासून बनणारा पदार्थ आहे. कोकोच्या झाडांची शेती ही मेक्सिकोमध्ये तब्बल तीन हजार वर्षा पासून लागवड केली जात आहे. साधारणत: इ.स.पू.१,१०० मधील लिखित पुरावे कोकोच्या बियांची खाण्याच्या पदार्थात वापर केल्याची माहिती मिळते.

Advertisement

चॉकलेटचा इतिहास हा लॅटिन अमेरिकापासून सुरू होतो. त्याचे काही अंशी संबंध हे मेक्सिकोमध्ये जोडलेले आहेत. १४ व्या शतकात कोकोच्या बियांचा वापर हा खरेदी विक्री साथी केला जात असे. कोकोच्या बियांची देवाण घेवाण करून विक्री व्हायची. भारतातिल मसाल्याचे पदार्थ जगभरात मागितले जयचे तसेच कोकोच्या बियांचे मूल्य मोठ्या प्रमान्त होते. १०० कोकोच्या बिया देऊन चक्क एका गुलामला विकले जायचे. १९व्या शतका पर्यंत लॅटिन अमेरिकेत बियांचा चलन म्हणून वापर केला जात असे.

Advertisement

इतकेच नव्हे तर स्पेनमधील चर्चने चॉकलेटला उपवासला चालते म्हणून खाण्यास परवानगी दिली होती.

Advertisement

आज आपण जे चॉकलेट खातो ते १८५० पासून लोकांना खायला उपलब्ध झाले. १८७५ मध्ये डायनियल पीटर आणि हेनरी नेसले यांनी दूध आणि कोक गोठवून चॉकलेट बार तयार केला. त्यात १८७९ मध्ये स्वित्झर्लंडच्या रुडॉल्फ लिंडटेने कोंच नावाची मशीन शोधली. तिथून सुरू झालेला चॉकलेटचा हा प्रवास आता वाड्या वस्त्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply